सोमवार, २१ जुलै, २००८

संत्र्याच्या सालींचे लोणचे चिमण शनि, १२/०८/२००६ - १९:२७.

वाढणी:२० जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
६ संत्र्यांची सालं (आतील दोरे काढून) बारीक चौकोनी तुकडे केलेले
कुठलाही लोणचे मसाला
१/४ वाटी मीठ
१ वाटी मोहनाची फोडणी
१० लिंबांचा रस
क्रमवार मार्गदर्शन:
संत्र्याच्या सालींचे बारीक चौकोनी तुकडे करून, त्याला मसाला, मीठ लावून/चोळून ठेवणे - साधारण १/२ तास.
त्यात लिंबाचा रस पिळून, मोहनाची फोडणी करून, परत कालवून ठेवणे.
त्या नंतर कधीही वाढायला घ्यावे. बाटलीत भरून, शीतकपाटात ठेवणे.
माहितीचा स्रोत:"सुग्रणीचा सल्ला"
अधिक टीपा:
लोणचं प्रकार आवडत असेल तर कशा बरोबर ही छान लागतं. लिंबाच्या लोणच्याच्या जवळची चव, पण तरीही संत्र्याचा वेगळा स्वाद आणि रंग येतो. शिवाय सालं फुकटही जात नाहीत. मी करून पाहिलं आहे. आणि वेळोवेळी पाहुण्यांच्या पसंतीस उतरलं आहे. पहिली दोन मिनिटं "कशाचं लोणचं आहे, ओळखा पाहू?" हा खेळही खेळता येतो :) !
- चिमण
हे मनोगत वरुण घेतले आहे.