मंगळवार, १५ जुलै, २००८

फोडणीचा पिट्टा ब्रेड सखु शुक्र, १२/१०/२००७ - १७:५६. वाढणी:

वाढणी:चार जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४ होल व्हीटचे पिट्टा ब्रेड
१ मोठा कांदा चिरून, ४ हिरव्या मिरच्या, लिंबू, कोथिंबीर
शेंगदाणे १/२ वाटी
तेल चार चमचे
मीठ, साखर चवीनुसार
मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता(असल्यास)
क्रमवार मार्गदर्शन:
पिट्टा ब्रेडचे हाताने तुकडे करावेत व मग Mixer मधुन बारीक करुन घ्यावेत.
तेल तापवून त्यात शेंगदाणे खरपूस तळावे. ते तेलातून बाहेर काढुन पिट्टा ब्रेड च्या चुर्यावर पसरावेत.
तेलात मोहरी, हिंग, हळद , कढिपत्ता , मिरच्या घालून खमंग फोडणी करावी.
त्यात कांदा घालावा, सोनेरी होईपर्यंत परतावा.
मग तळलेले शेंगदाणे , पिट्टा ब्रेडचा चुरा, व चवीनुसार मीठ, साखर त्यात घालावे. एक वाफ आणावी.
लिंबू पिळावे. कोथिंबीरीने सजवावे.
फोडणीच्या पोळीसारखंच दह्याबरोबर मस्त लागतो हा पदार्थ.
माहितीचा स्रोत:स्वत:चे प्रयोग
अधिक टीपा:
ज्यांना फोडणीची पोळी, भाकरी आवडते पण देशाबाहेर असल्याने मिळत नाही त्यांनी जरुर करा. देशाबाहेर असलो आणि नोकरीही करत असलो की आवश्यक तेवढ्याच पोळ्या केल्या जातात. मग पोळ्या ऊरल्या म्हणून फोडणीची पॊळी कधी करणार. म्हणून हा त्यातल्या जवळ जाणारा पर्याय.
पोहे करायची सवय असतेच. त्यामुळे एकट्या राहण्यार्या पुरुषांना देखील जमेल हे करायला.
हे मनोगत वरुण घेतले आहे.