मंगळवार, १५ जुलै, २००८

केळ्याची पोळी सौ. अबोली सोम, २१/०१/२००८ - १४:३१.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ मध्यम आकाराची पिकलेली केळी
१/२ वाटी पिठीसाखर
१ १/२ वाटी कणिक
तेल
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम केळी व्यवस्थित कुस्करून घ्यावी. त्यात पिठीसाखर, कडकडीत तेलाचे मोहन आणि बसेल तेवढी कणीक घालून पीठ मळून घ्यावे.
आता ह्या मिश्रणाच्या नेहमीप्रमाणे पोळ्या लाटून घ्याव्यात. तव्यावर भाजताना तेलाचा हात लावावा.
माहितीचा स्रोत:सौ. आई
अधिक टीपा:
खूप जास्त पिकलेल्या (अगदी काळी पडलेल्या सुद्धा) केळांचा उत्तम उपयोग करता येतो. साजूक तुपाबरोबर खायला मस्त लागतात.
वरील साहित्यात साधारण ५-६ पोळ्या होतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.