सोमवार, २१ जुलै, २००८

गोपाळकाला मन्जुशा गुरु, ०७/०९/२००६ - १५:०१.

वाढणी:१० जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
८ वाट्या धानाच्या व ८ वाट्या ज्वारीच्या लाह्या, २ वाट्या जाड पोहे,
प्रत्येकी २ मोठे चमचे आंब्याचे व लिंबाचे गोड लोणचे १ वाटी दूध,
१ वाटी दही , २ काकड्या बारीक चिरलेल्या, १ वाटी भिजवलेली हरभरा डाळ
डाळ १/२ वाटी भिजवलेले दाणे, १ वाटी डाळिंबाचे दाणे,बारीक चिरलेली
हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेल आलं आपल्या आवडीनुसार.
क्रमवार मार्गदर्शन:लाह्या, पोहे चाळून, निवडून व पाण्यातून काढून घेतल्या की वाळुची बारीक कचकच खातांना लागत नाही. एका मोठ्या पातेल्यात वरील सगळे जिन्नस एकत्र व चांगले मिसळून घ्या. अतिशय रुचकर व पौष्टीक गोपाळकाला तयार झाला.
माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:हा पदार्थ बिघडण्याची शक्यता नाही कारण आवडीनुसार प्रमाण बदलता येतं. इथे नागपुरला गणपती विसर्जनाला प्रसाद म्हणून आवर्जून करतात. जन्माष्टमी व अनंत चतुर्दशीला काल्याची चव काही न्यारीच लागते. डाएट फूड म्हणून मी न जेवता पोटभर कालाच खाते. प्रत्येक वेळी काला खाताना औरंगपुऱ्यातील एकनाथ मंदिरातल्या एकनाथ षष्ठीच्या काल्याची चव जिभेवर रेंगाळते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.