शुक्रवार, १८ जुलै, २००८

मुटकुळे सौ. अबोली रवि, ०७/०१/२००७ - १८:५२.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाटया कणिक,
४ चमचे तेल, साजूक तूप,
पाणी, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
कणकेमधे मीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून मिसळून घ्यावे. आता पाणी घालावे (पोळीसाठी घेतो तेवढेच!). पण अजिबात मळू नये. अगदी हलक्या हाताने फक्त सारखे करुन घ्यावे. आता जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून सोडावे. आणि भिजवलेल्या कणकेचे अगदी ओबडधोबड चपटे गोळे थापून साधारण करंगळी एवढे जाड आणि वाटीच्या आकाराएवढे हे मुटकूळे पातेल्यात लावावे आणि वर झाकणात पाणी घालून मंद आचेवर ठेवावे. चांगले खरपूस भाजावेत. उलटून दुसऱ्याबाजूने पण थोडे भाजावेत. गरज पडल्य़ास पुन्हा थोडे साजूक तूप सोडावे.
गरम गरम दूधाबरॊबर कुस्करून किंवा नुसते तूपाबरोबर खायला मस्त लागते.
माहितीचा स्रोत:सौ. आई
अधिक टीपा:
कणिक जर मळली तर खुसखुशीत न होता जरा कच्चे लागतात. म्हणून पाणी घालून कणिक अगदी नावाला फक्त मिसळून घ्यावी. (खरंतर कणिक मळायचा कंटाळा असणा‍ऱ्या माझ्यासारख्या लोकांना हे बरेच आहे. :) ) कधी पोळ्या लाटायचा कंटाळा आला तर अगदी उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.