मंगळवार, १५ जुलै, २००८

केक( संत्र्याचा) मन्जुशा शनि, १५/०३/२००८ - १०:५७.

वाढणी:आवडीनुसार
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मैदा १०० ग्र. अंडे २, साखर १०० ग्र. तूप\लोणी १०० ग्र. बेकिंग पावडर १\२ टीस्पू
५० ग्र संत्र्याचा रस, संत्र्याचा रंग व अर्क २ थेंब
क्रमवार मार्गदर्शन:मैदा बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे. साखर व तूप फेटून घ्यावे. फेटलेल्या तुपात हळुहळू मैदा मिसळा. ह्या मिश्रणात संत्राचा रस, रंग व अर्क मिसळा. हे मिश्रण बेकिंग डिशमध्ये ओता. ओव्हनमध्ये १८० फॅ. वर २५ मिनिट बेक करा.
माहितीचा स्रोत:शीलाताई
अधिक टीपा:मिश्रण घट्ट वाटल्यास थोडा रस टाकावा।
हे मनोगत वरुण घेतले आहे.