सोमवार, २१ जुलै, २००८

कणकेचा डोसा प्राजु गुरु, १४/०९/२००६ - ०५:३०.

कणकेचा डोसा
प्राजु
गुरु, १४/०९/२००६ - ०५:३०।

वाढणी:२ जणांसाठी... रात्री जेवणात
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कणिक १ कप, १ कप पाणी
१ मध्यम कांदा बारिक चिरून
४ हिरव्या मिरच्या बारिक चिरून
१ मोठा चमचा तेल
फोडणीचे साहित्य
२ चमचे दही, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
कणके मध्ये पाणी, दही, कांदा आणि मीठ घालून एकसारखे करावे. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून ती फोडणी त्या कालवलेल्या पिठात घालावी आणि परत एकसारखे हालवावे. लागल्यास थोडे पाणी घालावे. निर्लेपच्या तव्यावर तेल लावून उत्तपम प्रमाणे डोसे घालावेत. नारळाच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावेत.
पोळीला पर्याय म्हणून हे डोसे करता येतात.
माहितीचा स्रोत:इन्टरनेट
अधिक टीपा: ज्या मुलांना पोळी आवडत नाही त्यांच्या साठी हा मेनू करावा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.