सोमवार, २१ जुलै, २००८

बर्फी सायली जोशी मंगळ, ०१/०८/२००६ - १५:२४.

वाढणी:१५-२० वड्या
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाट्या दुध पावडर
१ कान्डी (बिना मिठाचे ) बटऱ
१ डबा मिल्क मैड
क्रमवार मार्गदर्शन:प्रथम ४०-५० सेकंद माइक्रोवेव्ह मधे बटऱ वितळवून घ्या.त्यात मिल्क मैड व दुध पावडर चांगली एकत्र करा.मग माइक्रोवेव्ह मधे १ मिनिट करता लावा, काढुन ढवळा, परत १ मिनिट करता लावा, असे ६-७ वेळा करा. मिश्रण घट्ट व तुकतुकीत दिसेल. मग प्लास्टिक वर पसरवून वड्या पाडा.
माहितीचा स्रोत:सायली
अधिक टीपा:
उपासाला पण चालू शकेल.