सोमवार, २१ जुलै, २००८

घरच्या घरी एस्प्रेसो कॉफी (यंत्राविना) अभिषेक सोम, ०२/१०/२००६ - ०९:३५.

घरच्या घरी एस्प्रेसो कॉफी (यंत्राविना) अभिषेक सोम, ०२/१०/२००६ - ०९:३५।

वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ कप गरम दूध,
१ छोटा चमचा कॉफी (इंस्टंट),
दीड चमचा साखर
क्रमवार मार्गदर्शन:
१. एका काचेच्या पेल्यात (पेलाच घ्यावा कारण ह्या कॉफीचा फेस खूप होतो) दीड चमचा साखर व कॉफी घ्यावी.
२. या मिश्रणात एक चमचा पाणी टाकून हे मिश्रण ५ ते ७ मिनीटे चांगले घोटावे.
३. घोटल्यानंतर हे मिश्रण फिकट तपकीरी रंगाची पेस्ट (मराठी शब्द??) होईल.
४. पेस्ट झाल्यानंतर या मिश्रणात एक कप गरम दूध (थोड्याशा उंचीवरून) टाकावे.
५. तयार झालेली कॉफी ४-५ सेकंद तशीच ठेवावी. आता या कॉफीवर २-३ सें.मी. फेस आलेला दिसेल. हा फेस तुम्ही चमच्याने खाऊ शकता.

माहितीचा स्रोत:असीम, माझा मित्र!!
अधिक टीपा:घरच्या घरी बनवीलेल्या एस्प्रेसो कॉफीचा आनंद लूटा!!!!!
हे मनोगत वरुण घेतले आहे.