मंगळवार, २२ जुलै, २००८

चुटपुटे परी आणि बदक गुरु, २७/०४/२००६ - ०३:३९.

वाढणी:कितीही केले तरी कमीच पडतात
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
चैत्रातल्या हळदी-कुंकवाला मिळतात ते चणे
फोडणीचे साहित्य
तिखट, चवीपुरतं मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
चणे स्वच्छ धुवून घ्यावेत. कढईत थोडं जास्त तेल घेऊन फोडणी करावी(तिखट न घालता) आणि त्यात चणे टाकावेत. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणावी. नंतर चण्यांवर तिखट घालून परतावे. चुटपुट असा आवाज आल्यावर गॅस बंद करावा.

माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:
ह्यावर लिंबू पिळले तरी चालते किंवा ओलं खोबरं घालून सुद्धा छान लागतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.