शुक्रवार, १८ जुलै, २००८

मेतकूट भात (वेगळा प्रकार) जान्हवी देशपांडे गुरु, १४/१२/२००६ - २३:२९.

वाढणी:२-३
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बासमती तांदुळ- २ वाट्या
मेतकुट - ३ चमचे
फोडणीसाठी तेल,मोहरी,जीरे
लिंबु- १
चवीनुसार मीठ, तिखट
साखर- अर्धा चमचा
क्रमवार मार्गदर्शन:
भात मोकळा शिजवून घ्यावा. भाताची वाफ गेल्यावर(पण भात गरम असावा) चमच्याने शिते मोकळी करावीत,त्यावर मेतकूट,तिखट,मीठ,साखर घालावे,दुसऱ्या पातेल्यात फोडणी करून,ही फोडणी भातावर घालावी,लिंबू पिळावे व सर्व एकत्र करावे.

माहितीचा स्रोत:अलकाताई
अधिक टीपा:नेहमीच्या मेतकूट-दुधभात,मेतकूट-तूपभात पेक्षा हा वेगळा प्रकार असुन मेतकूटाची खमंग,तिखट व लिंबामुळे थोडा आंबट छान लागतो, आणि झटपट तयार होतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.