मंगळवार, २२ जुलै, २००८

कणीस कीस रोहिणी बुध, १९/०४/२००६ - २३:३४.

वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कोवळी मक्याची लहान आकाराची कणसे ३-४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट २ चमचे, मीठ, चिमुटभर साखर
तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद
क्रमवार मार्गदर्शन:
मक्याची कोवळी कणसे किसून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घालणे. २-३ वाफा देवून शिजवणे व परतणे. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परतणे. गरम गरम खाणे.
रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:मक्याचा कीस पौष्टीक आहे व थोडा खाल्ला तरी पुरतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.