मंगळवार, २२ जुलै, २००८

कैरीची आंबटगोड चटणी सन्ध्या पिसाल बुध, २६/०४/२००६ - १३:२०.

वाढणी:५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तोतापुरी कच्ची कैरी-मध्यम आकाराची १
कैरीच्या पाव भाग गुळ- चिरलेला
लाल तिखट १ चमचा
जिरे १ चमचा
मीठ चविनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
कैरीची साल काढुन त्याच्या बारिक फोडी करुन, मिक्सरमधे थोडे मीठ टाकुन बारीक करुन घ्या. मग गुळ , तिखट, जिरे घालुन एकदम बारीक करा.
ही चटणी पोळी, ब्रेड बरोबरही खाता येते.

माहितीचा स्रोत:गुजराथी परिवार
अधिक टीपा:
कैरी तोतापुरी किंवा कमी आंबट असावी.
लाल तिखट रंगाने लाल पण, फार तिखट चवीचे नसावे.
फ्रीज मधे ८ दिवस सहज टिकते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.