मंगळवार, २२ जुलै, २००८

मेथी-मटर-मलई माधव कुळकर्णी गुरु, २३/०२/२००६ - ००:५२.

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३०० ग्रॅम निवडलेली कोवळी मेथी-(दोन मध्यम जुड्या).
अर्धा कप ताजी साय (मलई).
एक वाटी ताजे मटारचे दाणे.
एक मोठा कांदा बारीक कापून.
आलं- १इंच, लसुण पाकळ्या ८ ते १०.
पळीभर तेल, आमचूर व तिखट पावडर, किंचीत गोडा मसाला, चवीला मीठ.
क्रमवार मार्गदर्शन:
-आले लसूण मिक्सर मधून फिरवून घेणे.-कढईत किंवा फ्राय पॅन मध्ये तेल तापत ठेवावे. -दुसऱ्या चुलीवर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवावे.-तेल चांगले कडकडीत तापल्यावर थोडी मोहरी, जिरे व गोडा मसाला ह्याची नांवा/चवीपुरता फोडणी करावी. तिखट टाकू नये. -त्यावर कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यावा.-उकळलेल्या पाण्यात मेथी टाकून लागलीच थंड पाण्यात बुडवावी ह्याने मेथीचा हिरवा रंग भाजी करताना कायम टिकतो व मेथी शिजताना कडक होत नाही.-कांदा परतल्यावर त्यात आले लसूण व मटारचे दाणे घालून परत थोडे परतावे.-त्यावर मेथी टाकून परत दोन मिनिटे परतावे. (तळटीप पाहा)-त्यात लाल मिरची पावडर टाकून चांगले (४/५ मिनिटे) शिजू द्यावे.-शिजल्यावर आमचूर पावडर व मीठ टाकून एकजीव करावे.-दोन/तीन मिनिटे चुलीवर ठेवून सर्वात शेवटी मलई टाकावी.-एक मिनिटे वाट बघून मलई जरा गरम झाल्यासारखी वाटल्यावर लगेच चुलीवरून उतरवावी.-ढवळू नये. जेवायला बसताना ढवळावी.
गरम गरम पोळ्यांबरोबर वाढावी.
माहितीचा स्रोत:सौ.चा माझ्यावर प्रयोग-
अधिक टीपा:-मेथी शिजायला टाकल्यावर त्यात किंचीत लिंबू पिळल्यास रंग पक्का/कायम राहातो, मग आमचूर पावडर टाकू नये।-मटार ऐवजी बेबी कॉर्न किंवा मक्याचे दाण्यांचीही भाजी छान लागते.-मक्याच्या दाण्यांसोबत ही भाजी करताना मक्याचे दाणे उकडवून घ्यावेत.-मेथी ऐवजी पालक मटर मलई पण करता येते, ह्या भाजीच्या कृतीत मेथी गरम पाण्यात बुडवली तसे करायची गरज नाही (पण पालक बारीक चिरून घ्यावा)कारण पालकाची पाने मुळतः मऊ असतात.-मेथीची कुठल्याही प्रकारची भाजी बनवण्यापूर्वी ती गरम पाण्यातून काढल्यास शिजवताना कडक होत नाही. -शुभेच्छा !
हे मनोगत वॉन घेतले आहे.