सोमवार, २१ जुलै, २००८

प्लम पुडींग स्वाती दिनेश शनि, ०७/१०/२००६ - ११:४२.

वाढणी:३,४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४०० ग्राम प्लम,१ चहाचा चमचा लोणी,१५० ग्राम दही,
१ टेबल स्पून साखर,१अंडे,दालचिनी पावडर
क्रमवार मार्गदर्शन:
दही,साखर,अंडे व दालचिनी पूड एकत्र करुन हँड मिक्सरने फेटणे.एका बेकिंग डिशला लोणी लावून घेणे.प्लमचे तुकडे करणे व ते या डिश मध्ये लावून घेणे. फेटलेले मिश्रण त्यावर घालणे.१५ ते २० मिनीटे १८०अंश तापमानावर preheated oven मध्ये बेक करणे.
हे पुडींग+ वॅनिला आईस्क्रीम मस्तच लागते./किवा नुसतेही चांगले लागते.
माहितीचा स्रोत:त्सेंटा आजी
अधिक टीपा:
त्सेंटा आजी मला बऱ्याच जर्मन डिश शिकवत असते।त्यातील ही दुसरी ...
हे मनोगत वरुण घेतले आहे.