शनिवार, २६ जुलै, २००८

हैदराबादी पुलाव

वाढणी:४-५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ वाट्या शिजवून घेतलेला मोकळा भात
१ वाटी बारीक चिरलेला कांदा
अर्धी वाटी मटार
अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
१ टी. स्पून उडीद डाळ
१ टी. स्पून किसलेलं आलं, कढीपत्ता
३-४ सुक्या लाल मिरच्या
अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे
चवीपुरती साखर, मीठ
१ लिंबाचा रस
कोथिंबीर
फ़ोडणीसाठी तेल, हिंग, जिरे
क्रमवार मार्गदर्शन:
कृती
पहिल्यांदा तेल तापवून जिरे व हिंग घाला.
त्यानंतर उडीदडाळ घालून तांबूस रंग येईपर्यंत परता.
नंतर त्यात कांदा, मटार, आलं, सुक्या मिरच्या तुकडे करून, कढीपत्ता, टोमॅटो हे सर्व घालून परता.
कांदा व मटार शिजला की त्यात मोकळा भात, ओले खोबरे, साखर, मीठ व लिंबाचा रस घालून परतून एक वाफ येऊ द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.
अधिक टीपा:
शिळा भात खूप उरल्यास त्याचा असा पुलाव करावा.
तेलाएवजी तुपात केल्यास चविष्ट लागतो आणि बघताबघता संपून जातो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.