मंगळवार, २२ जुलै, २००८

पोळी फ़्राय !

वाढणी:गैरलागु
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
शिळ्या पोळ्या
तेल
तिखट
मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
ही डिश चहा सोबत किंवा नुसतीही छान लागते.
शिळ्या पोळ्यांचे हवे तसे आणि हवे त्या आकारात आकारात तुकडे करावे.
तेल चांगले तापले की त्यात पोळ्यांचे तुकडे तळुन घ्यावे.
थोडे गरम असताना तळलेल्या तुकड्यांवर तिखट आणि मीठ घालून खावे.
माहितीचा स्रोत:आठवत नाही !!
अधिक टीपा:
तळलेल्या पोळ्या थंड झाल्या तर मजा येत नाही.
हे मनोगत वरुण घेतले आहे.