सोमवार, २१ जुलै, २००८

अडेर रोहिणी रवि, ११/०६/२००६ - १६:५९.

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी तांदुळ
सर्व डाळी समप्रमाणात मिळून (मूग,तुर,उडीद,हरबरा) १ वाटी
लसूण ४-५ पाकळ्या
हिरवी मिरची ३-४
कांदा १, घावन घालण्यासाठी लागणारे तेल अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ चवीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
सर्व डाळी व तांदुळ ७-८ तास पाण्यामध्ये भिजत घालणे. नंतर मिक्सर मधून बारीक वाटणे. या वाटलेल्या मिश्रणात कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घालणे. चवीनुसार मीठ घालणे. नंतर हे मिश्रण एकसारखे कालवून त्याचे तव्यावर जाड अथवा पातळ घावन घालणे. दही किंवा कोणत्याही चटणी -लोणच्याबरोबर गरमगरम खाणे. हा एक अत्यंत पौष्टीक व पोटभरीचा पदार्थ आहे.
घावन = धिरडे = डोसा = उत्तप्पा = अडेर (एकुण सगळे एकच, नावे वेगवेगळी)
माहितीचा स्रोत:तमिळ मैत्रिण लक्ष्मी
अधिक टीपा:
अडेर खाण्याची पद्धत वेगळी आहे. अडेर वर 'चटणी पूड' नावाची कोरडी चटणी पसरतात व त्यावर तेल घालून त्याची गुंडाळी करून खातात. अडेर करताना सुक्या लाल मिरच्या घालतात. बाकी सर्व वरील दिलेला मसाला (कांदा, लसूण व मिरची) घालत नाही. अडेर बरोबर गूळ खातात. अडेर कोरड्या चटणीबरोबर खूप कोरडे लागते, म्हणून मी त्यात बाकीचा मसाला (कांदा,लसूण व मिरची) पण घालते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.