शनिवार, २६ जुलै, २००८

मुगडाळीचा शिरा

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी मुगाची डाळ
१ वाटी साखर
अर्धी वाटी साजूक तुप
१ वाटी पाणी
१ वाटी दूध
वेलदोडा पूड पाव चमचा
बेदाणे, बदाम काप आवडीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
कृती
मुगडाळ धुऊन २-३ तास भिजत घाला.
भिजल्यानंतर पुन्हा धुऊन उपसून ठेवा आणि बारीक वाटा.
कढईत तूप घालून वाटलेली डाळ गुलाबी रंगावर परता (प्रखर आचेवर).
दुसरीकडे दूध-पाणी एकत्र करून उकळवून त्यात घाला.
मंद आचेवर ३-४ वाफा आणा.
आता साखर घालून परत मंद आचेवर दोन वाफा येऊद्या.
बदाम-काप, वेलदोडा पूड, बेदाणे घाला आणि परत एक वाफ आणा.
गरमच खा.

माहितीचा स्रोत:सौ. आई (ए आई, अहो आई नव्हे)
अधिक टीपा:
निम्मे दूध - निम्मे पाणी न वापरता २ वाट्या दूध वापरले तरी चालते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.