शनिवार, २६ जुलै, २००८

मका टोस्ट

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ मक्याची कणसे,पाऊण कप दूध,पाऊण कप कॉर्न फ्लोअर ५/६ हिरव्या मिरच्या
लिम्बू ,मीठ, कोथिम्बिर , साखर ,चीज,मैदा ,तुप
क्रमवार मार्गदर्शन:
कणीस उकडून व किसून घ्या. पाऊण चमचा मैदा तुपात भाजून घेणे.
दुध व तुप मैद्यात घाला. उकळी आल्यावर कणसाचा गोळा टाका.
त्यात मिरची कोथिंबिर मीठ साखर लिंबू मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवावे. ब्रेड टोस्ट करून घ्या. त्यावर कणसाचा गोळा पसरावा.
परत ब्रेड कडक करून चिज किसून घालावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.