सोमवार, २८ जुलै, २००८

शेवयांची खीर.

वाढणी:७-८ जणांसाठी.
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बारीक शेवया मुठभर
दूध १ लिटर
साखर आवडीनुसार
वेलची पूड १ टीस्पून
तूप शेवया परतण्या साठी.
क्रमवार मार्गदर्शन:
शेवया केसांसारख्या बारीक घ्याव्यात. (शब्दशः नाही, अंदाजाने)
शेवया कुस्करून २-३ चमचे साजूक तुपावर लालसर रंगावर परतून घ्याव्यात.
दूध मंद गॅसवर उकळायला ठेवावे. त्यात वेलची पूड टाकावी.
दूध उकळले की त्यात परतून घेतलेल्या शेवया टाकून शिजवून घ्याव्यात.
शेवया शिजल्यावर त्यात आवडीनुसार साखर घालावी.
साखर विरघळल्यावर गॅस बंद करून खीर जरा थंड होऊ घ्यावी. जरा थंड झाली की ती किंचीत दाटसरही होते.
शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत:सौ. मुग्धा पेठकर.
अधिक टीपा:
यांत कांही जणं चारोळ्या टाकतात. चारोळ्या टाकायच्या झाल्यास त्या नीट निवडून घ्याव्यात. ( चारोळ्यां मध्ये कुजक्या चारोळ्याही सापडतात.) निवडल्या नंतर दूध उकळताना त्या त्यात घालून शिजवून घ्याव्यात. चारोळ्या शिजल्यावर साखर घालावी.
या खिरीत बेदाणे, बदामाचे कापही घालतात. आपल्या आवडीनुसार घालावे.
मला व्यक्तीशः बेदाणे आणि बदामाचे काप खीरीत आवडत नाहीत.
हे मनोगत वरुण घेतले आहे.