शुक्रवार, १८ जुलै, २००८

नानकटाई जान्हवी देशपांडे रवि, २४/१२/२००६ - ०६:५८.

वाढणी:लहान आकाराच्या -३४
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
रवा -१ कप
मैदा-१ कप
चनाडाळीचे पीठ(बेसन)-१ कप
साखर-१ कप
तुप-१ कप
मीठ-एक चिमुटभर
क्रमवार मार्गदर्शन:तुपात साखर विरघळून त्यात इतर सर्व साहित्य मिसळणे. हे मिश्रण ३० मिनिट झाकून ठेवावे. ओवन ३७५ डिग्री फॅरनहाईट(१९० डिग्री सेल्सिअस) साठी प्रिहीट करावे. लहान आकाराच्या नानकटाई बनवून १५ मिनिटासाठी बेक कराव्यात. १० मिनिटानंतर थंड झाल्यावर खायला तयार!!
माहितीचा स्रोत:सौ.आशाभाभी
अधिक टीपा:
या सोड्यावीना बनवलेल्या नानकटाई एकदम खुसखुशीत व ठिसूळ होतात. आइसक्रीम स्कुपने(मराठी शब्द??) नानकटाई बनवल्यास सर्व एकाच आकाराच्या होतात.
इथे आजकाल नाताळासाठी सगळ्यांकडे वेगवेगळ्या कुकीज बनवतात, या भारतीय कुकीज वेगळ्या चवीमुळे आमच्या फिरंगी मित्रांना आवडतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.