सोमवार, २१ जुलै, २००८

कुरकुरीत मसाला पुऱ्या प्राजु रवि, २४/०९/२००६ - ०६:१४.

कुरकुरीत मसाला पुऱ्या प्राजु रवि, २४/०९/२००६ - ०६:१४।

वाढणी:३-४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मैदा -२ कप
मीरे पावडर २ टी स्पून
जीरे १ टी स्पून
मीठ चवीनुसार
तेल १/४ कप सधारण मैद्यात घालायला, तळणीसाठी वेगळे
कोथिम्बीर बारिक चिरलेली १/२ कप, पाणी.
क्रमवार मार्गदर्शन:
मैद्यात मीठ, जिरे, मीरे पावडर घालून हाताने एक सारखा करून घ्यावा. मग त्यात थोडे थोडे तेल घालून सारखे हाताने हालवत राहावे. एक वेळ अशी येते की, मुठीत घेऊन दाबल्यावर मैद्याची कोरडीच पण वळी तयार होते. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
मग थोडे थोडे पाणी घालून मैदा घट्ट मळून घ्यावा आणि घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून अर्धा तास ठेवावा.
नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्या पातळ पुऱ्या लाटाव्यात. पुरी लाटल्या लाटल्या गरम तेलात सोडू नये. लाटल्या नंतर ती कागदावर टाकावी १५-२० मिनिटाने ती थोडी कोरडी झाली की एकदम गरम तेलात किंचित बदामी रंगावर तळून काढावी. अशाप्रकारे सगळ्या पुऱ्या तळून काढाव्यात.
तळलेल्या पुऱ्या टिशू पेपरवर टाकाव्यात.
माहितीचा स्रोत:मैत्रिण
अधिक टीपा:
मैद्यात तेल घालताना थोडे थोडेच घालावे. एकदम घालू नये आणि जास्तही घालू नये.
आधी सगळ्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि मग पहिल्यांदा लाटलेल्या पुरी पासून तळ्ण्यास सुरुवात करावी.
या पुऱ्या ८-८ दिवस टिकतात. प्रवासाला करून घेण्यासाठी उपयोगी पडतात. चहाबरोबर चांगल्या लागतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.