मंगळवार, १५ जुलै, २००८

सायीच्या वड्या मन्जुशा गुरु, ०१/११/२००७ - १०:२०.

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी साय, १ वाटी साखर
क्रमवार मार्गदर्शन:साय व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून मध्यम आचेवर शिजत ठेवावे. घट्ट होत आलं की गॅस बंद करून २ मिनिटे सतत ढवळावे. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण पसरवून वड्या कापाव्या.
माहितीचा स्रोत:मावशी
अधिक टीपा:सतत ढवळर राहावे म्हणजे पांढऱ्याशुभ्र वड्या होतात। वडी तोंडात टाकली की विरघळते.मधुर व करायला सोप्या अश्या ह्या वड्या दिवाळीत नक्की करून पहा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.