बुधवार, १६ जुलै, २००८

गाजर खीर रोहिणी रवि, ०८/०४/२००७ - ०८:३९.

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
गाजराचा कीस ३ वाट्या
साजूक तूप २ चमचे
साखर ८-१० चमचे
गाजराचा कीस बुडेल इतके दूध
काजू पूड ६ चमचे
क्रमवार मार्गदर्शन:एका कढईत/पातेल्यात मध्यम आचेवर साजूक तूप घालून त्यात किसलेले गाजर घालून थोडे परतणे. नंतर त्यावर झाकण ठेवून वाफेवर गाजर चांगले शिजवून घेणे. झाकण २-३ मिनिटे ठेवून परत झाकण काढून परत थोडे परतणे. असे ५-६ वेळा केले की गाजर शिजेल. वाटल्यास शिजवताना अगदी थोडे पाणी घालावे. नंतर त्यामध्ये गाजराचा कीस बुडेल इतके दूध, व साखर घालून दूध आटवणे. अधुन मधून ढवळणे. गाजराचा केशरी रंग दूधात उतरेपर्यंत दूध आटवणे. नंतर त्यात काजू पूड घालून अजुन थोडे आटवणे. अशी ही दाट केशरी रंगाची खीर तयार होईल. थोडक्यात शेवयाची खीर करतो त्याच पद्धतीने करायची. साखर आपल्या आवडीनुसार कमी/जास्त घालणे.
माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:
हे मनोगत वरुण घेतले आहे.