बुधवार, १६ जुलै, २००८

दम आलू(काश्मिरी पद्धत) गौरीदिल्ली शुक्र, १८/०५/२००७ - १२:४०.

वाढणी:४-५
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उकडलेले बटाटे -१० छोटे
तेल(कोणतेही)- ४ चमचे
लवन्ग-४-५
हिरवी इलायची-४-५
काळी इलायची-२,हिन्ग(२ च), आल्याची पूड(१ च), काश्मिरी मिरची पूड(१ च)
गरम मसाला (१/२ च)
दही(२ मोठे च),
पाणी(२ कप),
मीठ(चवीनुसार
तेल तळ्न्ण्यासाठी
क्रमवार मार्गदर्शन:
कढईत तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे आणि बाजूला काढऊन ठेवावेत.
आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात हिरवी इलायची,लवन्ग, मीठ,हिन्ग,आल्याची पूड आणि काश्मिरी मिरची पूड घालावे.थोडसे परतून घ्यावे.मसाले करपू नयेत ह्याची काळजी घ्यावी.
आता त्यात दही घालून एकसारखे हलवावे.नंतर त्यात पाणी घालून त्याला एक उकळ आणावी.आता हळूहळू त्यात बटाटे सोडावेत.मंद आचेवर ठेवावे आणि उकळावेत.वरून गरम मसाला घालावा.
गरम मोकळ्या भातावर खायला छान लागतो.
(कांदा टोमेटो घालायची गरज भासणार नाही)
माहितीचा स्रोत:सासू
अधिक टीपा:हवे असल्यास बटाट्याला भोके पाडावीत म्हणजे मसाल आत मूरतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.