शुक्रवार, १८ जुलै, २००८

पिकलेल्या केळ्यांची भाजी स्वाती दिनेश शनि, २५/११/२००६ - ११:१२.

वाढणी:२,३ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
८ पिकलेली पण कडक,हिरव्या सालीची केळी,ओले खोबरे १/२ वाटी
मूठभर कोथिंबीर,धने पावडर २ टे‌पून,१ चहाचा चमचा काळा मसाला,
डाळीचे पीठ २ टे स्पून,तिखट,मीठ,साखर चवीनुसार,फोडणीचे सामान,तेल २टे स्पून
क्रमवार मार्गदर्शन:केळी धुवून डेख काढून सालासकट ४ मोठे तुकडे करा,तेल गरम करा,फोडणी करा, त्यात हे केळ्यांचे तुकडे घाला व हलक्या हाताने परता,धने पावडर,काळा मसाला,खोबरे व डाळीचे पीठ,तिखट,मीठ,साखर घालून परता आणि झाकण ठेवून शिजू द्या.कोथिंबीर घाला.ही भाजी गोडसर असते.खाताना साल काढून टाका,पोळी/फुलक्यांबरोबर खा.
माहितीचा स्रोत:गीता भाभी
अधिक टीपा:
गीताभाभी या गुर्जर काकूंनी गणपतीत खूप प्रसादाची केळी येतात त्याचं काय करायचं? यावर हा तोडगा काढला, ही भाजी फारच छान लागते.वेलची केळी, किवा पिवळ्या सालीची मोठी (स्पॅनिश)केळी यांची ही भाजी चांगली लागत नाही,त्याला हिरव्या सालीची गाडीवर मिळतात ती १५ की २० रु डझनवालीच केळी हवीत..(नक्की भाव माहित नाही.)
हे मनोगत वरुण घेतले आहे.