सोमवार, २८ जुलै, २००८

शेवयांचा उपमा

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कुस्करलेल्या शेवया १ वाटी
साजुक तुप अथवा तेल
मोहोरी, हिंग
मीठ, साखर, लिंबू १/२
कांदा १/२, हिरव्या मिरच्या ३,
भाजलेले शेंगदाणे १०/१२
क्रमवार मार्गदर्शन:
१ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घेणे. शेवया भाजताना गॅस मंद ठेवणे.
४ ते ५ चमचे साजुक तूप अथवा तेलामधे मोहोरी व हिंग घालुन त्यात मिरच्या, कांदा, भाजलेले दाणे घालुन परतणे. कांदा शिजायला पाहिजे. नंतर त्यात २ वाट्या पाणी ,चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन लिंबू पिळणे. ढवळणे. पाण्याला उकळी आली कि त्यात भाजलेल्या शेवया घालुन ढवळणे. नंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवणे.
रोहिणी

माहितीचा स्रोत:तमीळ मैत्रिण उमा
हे मनोगत वरुण घेतले आहे.