सोमवार, २८ जुलै, २००८

दुधी भोपळ्याचे सूप

वाढणी:४ जणासाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ छोटा दुधी भोपळा
१ बटाटा
१ टोमॅटो
१ कान्दा
मूठभर मुगाची डाळ
१ कप दूध
२ चहाचे चमचे गव्हाचे पीठ
१ चहाचा चमचा तूप
मीठ, मिरे पूड चवीपुरती
थोडी कोथिम्बीर
क्रमवार मार्गदर्शन:
१. कापलेला दुधी भोपळा(सालासकट), कापलेला टोमॅटो व बटाटा (साले काढून), धुतलेली मुगाची डाळ कुकरमधे अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.
२. कान्दा चिरुन १/२ चमचा तुपावर परतून मऊ करुन घ्यावा, त्यातच थोडी कोथिम्बीरही टाकावी.
३. कुकरमधे शिजवलेले पदार्थ व परतलेला कान्दा-कोथिम्बीर मिक्सरमधे एकत्र वाटावे.
४. पातेल्यात १/२ चमचा तूप घालून गव्हाचे पीठ टाकावे व लालसर परतावे. लगेच त्यात कपभर दूध टाकून ढवळावे.
५. पीठ शिजले की थोडे दाट होईल. त्यात मिक्सरमधून काढलेले मिश्रण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
६. चवीपुरते मीठ घालून उकळी आणावी.
७. सर्व्ह करताना मिरे पूड घालावी.

माहितीचा स्रोत:माझी चेन्नैमधील मैत्रीण सन्ध्या कोर्डे
हे मनोगत वरुण घेतले आहे.