मंगळवार, २२ जुलै, २००८

सोयाबीनची भाजी अनु गुरु, २६/०१/२००६ - ०५:५६.

वाढणी:सोयाबीन आवडते असे निवडक लोक
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बाजारात मिळणारे सोयाबीनचे १ पाकिट(सांडग्यासारखे दिसतात.)
कोथिंबीर
मसाला
तळणीपुरते तेल
मीठ
क्रमवार मार्गदर्शन:१. सोयाबीनचे २ मुठी नग पाण्यात भिजत टाकावेत.२. १५ मिनीटांनी काढून हाताने व्यवस्थित पिळून पाणी काढून टाकावे.३. तेलात खमंग तळावे. ४. फोडणी करावी.५. त्यात हे सोयाबीन चांगले परतावेत.६. मीठ मसाला कोथिंबीर टाकून नीट मिसळेपर्यंत हलवावे.७. गरम गरम भात/खिचडी/पोळीबरोबर खावी.
माहितीचा स्रोत:वसतिगृहात मैत्रिणींचे बघून
अधिक टीपा:सोयाबीन बऱ्याच जणांना आवडत नाही। पण जेव्हा ताज्या भाज्यांची साठवण ठेवण्यासारखी परिस्थिती किंवा चिरणे वगैरे वेळ नसेल तेव्हा ही भाजी मदतीला येते. कुरकुरीत लागते. सोयाबीन नीट भिजू द्यावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.