शनिवार, २६ जुलै, २००८

मठ्ठा

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
६ वाट्या ताक
३ हिरव्या मिरच्या
कोथिंबिर
४ पाने पुदीना
मिठ, साखर, जिरे पावडर
क्रमवार मार्गदर्शन:
१. ताकामध्ये थंड पाणी घालुन पातळ करून घ्या.
२. मिरची कोथिंबिर पुदिना वाटुन घेउन ताकमध्ये मिसळा.
३. मग जिरेपावडर घाला १ टिस्पु. चवीप्रमाणे मिठ, साखर घाला.
४. रवीने सुंदर घुसळून घ्या.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:अप्रतिम लागतो । आणि १५ मिनटात होतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.