मंगळवार, २२ जुलै, २००८

कुटाचे लाडू अनुप्रिता गुरु, १३/०४/२००६ - ०६:१७.

वाढणी:2 जणांसाठी दिवसभर खायला
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
2 चमचे शुद्ध तूप
2 वाट्या शेंगदाणे भाजून त्यांचे केलेले कूट
पाऊण वाटी दळलेली साखर
अर्धा चमचा वेलचीपूड
क्रमवार मार्गदर्शन:तूप थाळीत फेसायला घ्या. ते हाताच्या उष्णतेने पातळ झाले की त्यात थोडी थोडी करून दळलेली साखर घालत फेसत रहा. साखर फेसून झाल्यावर दाण्याचे कूट आणि वेलचीपूड घालून लिंबाच्या आकाराचे लाडू वळा.
माहितीचा स्रोत:आजीबाई
अधिक टीपा:फक्त 10 ते 15 मिनिटात होणारे हे उपासाचे लाडू खायचा आनंद घेण्यासाठी लगेचच करुन पहा।
हे मनोगत वरुण घेतले आहे.