सोमवार, २८ जुलै, २००८

ब्रेड पीझ्झा

वाढणी:पोट भरेपर्यन्त...
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
स्लाईस्ड ब्रेड, ब्रेडब्रेब्रबस्लाईसस्
भाज्याः गाजर, कोबी, कान्दा, बीट ( सर्व कीस करून)
इतर जिन्न्सः तेल, मीठ, सायीचे दही,
क्रमवार मार्गदर्शन:१. प्रथम सर्व भाज्या कीस करून घ्याव्यात. नंतर तेलावर चांगल्या परताव्यात. चवीप्रमाणे मीठ घालावे.२. भाजी करून झाल्यावर, स्लाईस्ड ब्रेडवर या भाज्यांचा जाडसर थर पसरावा,३. भाज्यांच्या थरावर चीझ ग्रेट करून घालावे.४. मायक्रोवेव्ह ओव्ह्न असेल तर, २ मिनिटे १००० वॅटवर भाजावे.५. अन्यथा, तव्यावर लोणी घालून त्यावर आधी तयार केलेला ब्रेड भाजावा.६. ब्रेड खालून तांबूस झाला की बाहेर काढून लगेच खावा.
माहितीचा स्रोत:स्व्यपाकघरातले प्रयोग...
अधिक टीपा:बाहेर मिळ्णार्या आयत्या पीझ्झ्यांपेक्शा घरी केलेला हा पीझ्झा नक्कीच चविश्ट लागतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.