सोमवार, २१ जुलै, २००८

कोरफ़ड पाक जान्हवी देशपांडे शनि, ०३/०६/२००६ - २०:१९.

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मोठया(जाड) कोरफ़डीचे एक पान
मध ४ चमचे
काजु आणि इतर सुका मेवा २ चमचे
वेलदोडे २
जायफ़ळ चिमुट्भर
केशर ४-५ काड्या
क्रमवार मार्गदर्शन:
कोरफडीच्या पानाला चाकूने उभा काप देणे,जेणेकरून दोन भाग होतील.
मधील गराला चाकूने २-२ बोटाच्या अंतराने आडवे काप देणे. चमच्याने गर सालींपासून अलगद वेगळे करुन मोठ्या वाटीत काढणे. त्यात वरील इतर साहित्य टाकून मिसळणे. वाटीत खायला देणे.जेली सारखा हा पाक चवीला छान लागतो.

माहितीचा स्रोत:सौ. सासुबाई
अधिक टीपा:
कोरफडीत अ जीवनसत्व भरपूर असते.यकृतासाठी,पोटदुखीसाठी,सांधेदुखीसाठी गुणकारी असते. असा आरोग्यवर्धक पाक चवीसपण चांगला लागतो.