सोमवार, २१ जुलै, २००८

पियूष भाष शनि, १६/०९/२००६ - ०२:०४.

पियूष
भाष
शनि, १६/०९/२००६ - ०२:०४।

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
गार दही अर्धा लिटर
साखर १०० ग्रॅम
केशर एक चिमूट
गार पाणी
क्रमवार मार्गदर्शन:
केशर कुरकुरीत नसेल तर हलकेच भाजून घ्या. नंतर हातानेच केशराची चांगली पूड करा.
दही, पाणी, केशर आणि साखर सर्व रवीने वा यांत्रिक घुसळणीने (ब्लेंडर) घुसळा. छान पेल्यात चौघाजणांना प्यायला द्या. झटपट मजा.
वैयक्तिक पसंतीनुसार साखर आणि पाण्याचे प्रमाण बदलू शकता. तोच नियम दही किती आंबट असावे यासाठी पण.
"जनसेवा" ची आठवण आली की नाही ते सांगा! (पुणेकरांसाठी)
सुभाष
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:
तयार केलेले पियूष ४-६ तास मुरू दिले तर केशर छान विरघळून सुवास जास्त फुलतो, पण तेव्हढा दम सहसा धरवत नाही हेच खरे.
तसेच लोकलज्जेस्तव हे चार जणांना पुरेल असे लिहिले आहे. मी ते एकटाच पितो. पत्नि जवळ असली तर कुरकुरत तिला एखादा पेला देतो. -सुभाष
हे मनोगत वरुण घेतले आहे.