शुक्रवार, १८ जुलै, २००८

रस्सम नीला कौथेकर मंगळ, १८/०९/२००७ - १९:४९.

वाढणी:३-४
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
टोमॅटो -२
लाल गोल मिरच्या-३-४
ऱस्सम पावडर - १ चमचा
चिंच - १ इंच
चांगले तुप -१-२ चमचा
मेथ्या ४-५ दाणे
हिंग, जीरे
गूळ -२ चमचा
वरणाचे पाणी -१ वाटी
लसणाच्या पाकळ्या -४-५
कडीपत्ता - ६-७ पाने
कोथिंबीर
क्रमवार मार्गदर्शन:
चिंच भिजवून घ्या
टोमॅटो उकडून घ्या
टोमॅटोची साल काढून मिक्सर मधून बारीक करून घ्या
२ वाटी पाण्यात टोमॅटोचा रस आणि चिंचेचे पाणी मिसळून घ्यावे.
त्यात रस्सम पावडर टाकावी.
चांगले तूप गरम करून त्यात जीरे,वाटलेला लसण, मेथ्यांचे दाणे, कडीपत्ता, लाल मिरची, कोथिंबीर व हिंग टाकावे.
फोडणीत मिश्रण टाकून मीठ व गूळ टाकावे
उकळत आल्यावर वरणाचे पाणी टाकावे.
माहितीचा स्रोत:माझी ताई
अधिक टीपा:टोमॅटोच्या अंबटपणा वरून गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे
हे मनोगत वरुण घेतले आहे.