बुधवार, १६ जुलै, २००८

झित्रोनकुकन (लिंबाचा केक) स्वाती दिनेश रवि, २४/०६/२००७ - १४:२९.

वाढणी:४,५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१८० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२५० ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,२५० ग्राम लोणी/तूप,५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,२ चहाचे चमचे वॅनिला अर्क,१ चिमूट मीठ
१००-१२५ ग्राम पिठीसाखर,४,५ लिंबांचा रस
क्रमवार मार्गदर्शन:
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.वॅनिला इसेन्स घालून फेटणे.मैदा+बेकिंग पावडर एकत्र करणे व ते घालून फेटणे. केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ६० ते ६५ मिनिटे बेक करणे.केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही.कोमट झाला की त्याला टोचणीने/विणायच्या सुईने(विणायच्या सुईशी माझा एवढाच संबंध!) सर्व बाजूंनी भोके पाडणे.लिंबांचा रस+ पिठीसाखर एका ट्रे/मोठ्या ताटलीत घेणे व त्यात हा केक उलट सुलट सर्व बाजूंनी घोळवणे‌‌.कडा जास्त घोळवणे.रस सगळीकडे लागायला हवा आणि केक च्या आतही जायला हवा.गार झाल्यावर तुकडे करणे‍. गरम गरम कॉफीबरोबर खाणे.(जर्मनीत केक बरोबर कॉफी लागतेच लागते! आपण जसे चहाफराळाला बोलावतो तसे ते लोक 'काफे उंड कुकन' साठी बोलावतात!)
माहितीचा स्रोत: मनोगत
अधिक टीपा:हे तुकडे प्लास्टीक कागदात गुंडाळून प्लास्टीक डब्यात घालून डीप फ्रिझ मध्ये ठेवले तर ४,५ महिने टिकतात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.