मंगळवार, १५ जुलै, २००८

तोय सुनील रवि, २९/०७/२००७ - २३:३७.

वाढणी:दोघांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तूर डाळ - १ वाटी
तूप - एक चमचा
मोहरी - १/२ चमचा
हिंग - चिमूट्भर
सुक्या मिरच्या - २
मीठ - चवीपुरते
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम तूर डाळ शिजवून घ्यावी. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे.
तूप गरम करून मोहरी, हिंग आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून डाळीला द्यावी.
चवीपुरते मीठ घालावे.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:
तोयीच्या फोडणीला कढीपत्तादेखील घालतात.
गरम गरम भाताबरोबर तोय घेताना वर लिंबू पिळून घ्यावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.