सोमवार, २८ जुलै, २००८

फ़िश फ़्राय

वाढणी:२-३ (पापलेटच्या आकारानूसार)
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ पापलेट
अर्धा चमचा तिखट
पाव चमचा हळद
मीठ
रवा, थोडी कणिक
तेल
क्रमवार मार्गदर्शन:१. पापलेटचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे (तुकडे डोकं ते शेपूट यात समांतर करावेत.२. तुकड्यांना तिखट, हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवावे.३. रवा आणि थोडी कणिक एकत्र करून त्यात पापलेटचे तुकडे परतवून (रवा नीट लागला पहिजे पापलेटला) मंद आचेच्या तव्यावर थोडं तेल टाकून त्यावर ठेवावेत.४. अंदाजाने अधून मधून परतवावेत (म्हणजे नीट शिजतात). गरज असेल तर तेल घालावं.५. १०-१५ मिनिटांमधे पापलेट नीत शिजते. वासावरून किंवा सुरी खुपसून शिजल्याचा अंदाज लागतो
माहितीचा स्रोत:ऐकैव, अनूभव, दुसर्‍यांचे बघून
अधिक टीपा:१।फ़िश करी (घुमण) आणि साधा भाताबरोबर (मला) जास्त चांगलं लागते.२. पापलेटला आले-लसुण, चिमुटभर गरम मसाला आणि चिंच किंवा लिंबू लावला (तिखट , हळद आणि मीठा बरोबरीने) तर आस्वाद वाढतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.