सोमवार, २१ जुलै, २००८

पनीर कटलेट्‍स अनुप्रिता मंगळ, २३/०५/२००६ - ११:५८.

वाढणी:2 जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
250 ग्रॅम्स पनीर, 50 ग्रॅम्स चीझ, 4 ब्रेड स्लाइस, 4 चमचे ओले खोबरे
आले जरासे , 3ते 4 मिरच्या , अर्धाचमचा जिरेपूड , मिठ चवीनुसार,
मनसोक्त कोथिंबीर आणि पुदिना, तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
ओलेखोबरे, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या आले वाटून घ्या, पनीर कुस्करुन घ्या, चीझ किसून घ्या, सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र झाले की त्यात जीरेपूड व मिठ घाला, ब्रेडच्या स्लाईस पाण्यातून काढून घट्‍ट पिळा. त्याही या मिश्रणात मिसळा. चपटे कटलेट्‍स करुन उथळ भांड्‍यात सोनेरी रंगावर तळा
माहितीचा स्रोत:सासूबाई
अधिक टीपा:खजूराची चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम खा।
हे मनोगत वरुण घेतले आहे.