शुक्रवार, १८ जुलै, २००८

प्लम सुफले स्वाती दिनेश शुक्र, १२/०१/२००७ - १०:५९.

वाढणी:३,४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा
१.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क/२ पाकिटे वॅनिला साखर
१५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते.
१ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे. एका वाडग्यात अंड्यातील पांढरे,१ चिमूट मीठ,वॅनिला अर्क/साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम बनला पाहिजे.(याला आयश्ने म्हणतात.)भरपूर फेटावे लागते.दुसऱ्या वाडग्यात अंड्यातील पिवळे व पांढरे वेगळे करणे.क्वार्क,अंड्यातील पिवळा बलक,मैदा,लिंबाची किसलेली साल,साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने चांगले फेटणे.या मिश्रणात वरील आयश्ने घालणे व न फेटता फक्त एकत्र करणे. हे मिश्रण प्लम्स वर घालणे.प्रिहिटेड अवन मध्ये २५-२७ मिनिटे १८०अंशावर बेक करणे.गरम/गार/कोमट जसे हवे तसे खाणे.
माहितीचा स्रोत:त्सेंटा आजी
अधिक टीपा:आयश्ने: आय=अंडे, श्ने= हिम
हे मनोगत वरुण घेतले आहे.