मंगळवार, २२ जुलै, २००८

आल्याची वडी सुखदा रवि, २९/०१/२००६ - ०७:०६.

वाढणी:१ ताट भर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पाव किलो आले
८०० ग्रॅम साखर
तूप
क्रमवार मार्गदर्शन:आले स्वच्छ धुऊन घेऊन मिक्सर मधे वाटून पेस्ट करावी. कढईमधे आल्याची पेस्ट आणि साखर घालून उकळत ठेवावे. साखर वितळून मिश्रण एकजीव होते. मिश्रण जरा घट्ट होत आले की त्यात एक चमचा तूप सोडावे. तुपाचा हात लावलेल्या ताटात मिश्रण थापून घ्यावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.
माहितीचा स्रोत:सासूबाई
अधिक टीपा:
आल्याच्या वड्या दूध घालूनही करतात पण त्या फार दिवस टिकत नाहीत. दूध घालून वड्या करतानाही वरील पद्धतीनेच कराव्या. आले आणि साखर जेमतेम बुडेल एव्हढे दूध घालावे.
सुंठवड्यामधे सुंठ पूड, पिठीसाखर, भाजलेले सुके खोबरे खिरापतीप्रमाणे एकत्र करतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.