सोमवार, २८ जुलै, २००८

वांग्याचे काप

वाढणी:एका मोठ्या वांग्याचे साधारण १० काप होतात. त्यानुसार वाढणी बदलेल.
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
वांग्याचे गोल काप (चकत्या), मीठ, तिखट, तांदुळाची पिठी, तेल
क्रमवार मार्गदर्शन:
कृती -
१. वांग्याचे मध्यम जाडीचे गोल काप करावे. [यासाठी 'भरताचे वांगे' वापरणे. छोटे काटेरी वांगे नव्हे.]
२. तांदुळाच्या पिठीत चवीनुसार मीठ, लाल तिखट कालवून घ्यावे.
३. वांग्याचे काप या पिठीत घोळून घ्यावे.
४. तापलेल्या तव्यावर हे काप तेलावर परतावे. कापांच्या कडेने तेल सोडणे.
असे खरपूस भाजलेले काप जेवताना 'तोंडीलावणे' म्हणून छान लागतात.
माहितीचा स्रोत:अर्थातच आमच्या माऊली !!
हे मनोगत वरुण घेतले आहे.