शनिवार, २६ जुलै, २००८

मेथीचे लाडु

वाढणी:५ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१/२ कि. मेथी,१/२ कि. करमरीत गव्हाचे पिठ,डिंक २५० ग्रम
१ कि. शेंगदाणा तेल,१ १/२ कि. गूळ,
१/२ किलो खोबरं
१/२ ख़ारिक
१२५ ग्रॅम गोडंबी
काजु,बदाम आपल्या आवडी प्रमाणे
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम मेथी भाजुन घेणे. ती दळुण आणणे. मिक्सर वर दळली तरी चालेल. १/२ कि. गहु करमरीत दळुण आणणे. नंतर मेथीच्या पिठाला रात्री थोडे दुध लावुन ठेवणे.Next day डिंक तळुण घेणे.
नंतर तेलात गव्हाचे पिठ खमंग भाजुन घेऊन परातित टाकणे.
नंतर दुध लावलेले मेथीचे पिठ न भाजता गव्हाच्या पिठात कालवणे.
तेल गरम करावयास ठेवणे.त्यात गुळ बारीक करुन टाकणे. नंतर ते पिठवर ओतणे व चांगले कालवुन घेणे.त्यात खोबरे किसुन ,भाजुन कालवणे.खारिक,बदाम,काजु, बारीक करुन टाकणे. डिंक तळुन आणि कुटुन टाकणे. नंतर गोल गोल लाडु बनवणे.
हे लाडु अतिशय सुंदर लागतात.
सौ . रुपाली रोकडे
माहितीचा स्रोत:माझी आई (सौ . विमल साळी)
अधिक टीपा:यात तेलाऐवजी साजुक तुपहि वापरु शकतात ।
हे मनोगत वरुण घेतले आहे.