बुधवार, १६ जुलै, २००८

आंबावडी मन्जुशा सोम, ११/०६/२००७ - १६:१५.

वाढणी:आवडीनुसार
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी आंब्याचा रस, १ वाटी दूध, १ वाटी साखर, २ चमचे पीठी साखर
ताटलीला लावायला अर्धा चमचा तूप.
क्रमवार मार्गदर्शन:वरील सर्व जिन्नस ( पिठी साखर सोडून) एका पसरट कढईत एकत्र करून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. मिश्रण घट्ट होत आले की आच बंद करावी व त्यात पिठी साखर घालून २ मिनिटे ढवळत राहावे. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण पसरवावे व आपल्या आवडीनुसार वड्या कापाव्यात.
माहितीचा स्रोत: मनोगत
अधिक टीपा:ह्या वड्या नारळांबा वडीपेक्षा जास्त दिवस टिकतात पण खरं तर तशी वेळच येत नाही।
हे मनोगत वरुण घेतले आहे.