शुक्रवार, १८ जुलै, २००८

उपवासाचे कबाब माधव कुळकर्णी बुध, २२/११/२००६ - ११:३६.

वाढणी:२ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी भिजवलेला साबुदाणा
३/४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
अर्धी वाटी उपवासाच्या भाजणीचे पीठ
अर्धी वाटी दही, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट
हिरव्या मिरच्या व आले बारीक वाटून
जीरे, मीठ, साखर व तुप चवीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
उकडलेले बटाटे किसून किंवा स्मॅशरने बारीक करून घ्यावेत.
भिजवलेला साबुदाणा, जिरे, मीठ व साखर त्यात एकजीव करून घ्यावे.
मिश्रणात दही व दाण्याचा कूट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या/आले चांगले मिसळून घ्यावे.
सर्वांत शेवटी उपवासाची भाजणी त्यात एकत्र करून हाताने वळून सळी भोवती लांबट गोल (कबाबासारखे) लावून घ्यावे.
ह्या मिश्रणावर तुपाचा हात फिरवून सळी गॅस वर मंद आचेवर फिरवत राहणे. (बर्नरवर ठेवू नये)
सर्व बाजूंनी लाल खरपूस भाजले गेल्यावर परत तुपाचा हात फिरवावा.
चांगले भाजले गेल्यास हाताने अलगद सळीपासून दूर करता येतात.
वाढताना उपवासाच्या चटणी बरोबर किंवा भाजलेल्या मिरच्यांबरोबर वाढावे.
माहितीचा स्रोत:मोठी बहीण
अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी उपवासाचे कबाब खातांना त्यांना कबाब म्हणू नयेत
हे मनोगत वरुण घेतले आहे.