मंगळवार, १५ जुलै, २००८

पौष्टिक रंगीत पराठे प्राजा मंगळ, ०४/०३/२००८ - १५:१४.

वाढणी:५ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वट्या कणिक, चवी पुरते मिठ, १ चमचा साखर
प्रत्येकी २ छोटे चमचे किसलेले गाजर, बिट, कोबी
१ चमचा आल, लसुण, मिरची पेस्ट
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
पाव चमचा ओवा, मळण्या पुरते तेल, पाणी
साजुक तुप, चीज किसुन सजवण्यासाठी
क्रमवार मार्गदर्शन:
वरील साजुक तुप आणि चीज सोडुन सर्व जिन्नस एकत्र करुन चांगले मळुन घ्या. थोड जाडसरच ठेवा. मग पराठे लाटुन मध्यम गॅसवर भाजा, वरुन साजुक तुप सोडा. झाल्यावर वरुन चिज हवे असल्यास पसरवा.
माहितीचा स्रोत:स्वतः .
अधिक टीपा:
हे पराठे करायला सोपे, पौष्टीक व दिसायला आकर्षक होतात कोबी, गाजर, बिट न आवडणारी मुले व माणसेही हे पराठे ताव मारुन खातात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.