सोमवार, २१ जुलै, २००८

फिरनी मी दादरकर सोम, ०७/०८/२००६ - ११:०१.

वाढणी:सहा जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दूध एक लिटर
काजू अर्धा वाटी
बदाम अर्धा वाटी
बासमती तांदूळ ४ मोठे(टेबल) चमचे
साखर ६ मोठे चमचे
सुके अंजिर, जरदाळू, खारिक प्रत्येकी ४
चिमूटभर केशर
क्रमवार मार्गदर्शन:तांदूळ, काजू,बदाम वेगवेगळे दोन तास भिजवा. बदाम साले काढून काजूबरोबर पाण्याशिवाय वाटा. तांदूळ एक मोठा चमचा पाण्याबरोबर वाटा तांदूळ,काजू,बदाम पेस्टमध्ये थोडे थंड (तापवून थंड केलेले) दूध घालून एकजीव करा. उरलेल्या दूधाला उकळी काढा. उकळी आली की गॅस अगदी बारीक करून एका हाताने काजू बदाम तांदूळ पेस्ट हळू हळू दुधात घाला आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा. शक्यतो फिरनीसाठी नॉनस्टिक भांडे वापरा.४-५ मिनिटात मिश्रण शिजेल. मग साखर व कोमट दुधात खललेले केशर घाला आणि ढवळा. आणखी ४-५ मिनिटांनी गॅस बंद करा. सुके अंजीर,खारीक व जर्दाळूचे तुकडे घालून झाकण ठेवा.
माहितीचा स्रोत:मैत्रिण --मुनीरा शेख
अधिक टीपा:फिरनी थंड करून खाल्ली तर अधिक चांगली लागते। जितके काजू बदामाचे प्रमाण जास्त तितकी फिरनी चविष्ट. कंडेन्स्ड मिल्क वापरले तर फिरनी अप्रतिम होते. मात्र साखरेचे प्रमाण कमी करावे लागते. कंडेन्स्ड मिल्क वापरले तर ते सर्वात शेवटी घालावे. अंजीर जरदाळू घातल्यावर फिरनी गरम करू नये.
हे मनोगत वरुण घेतले आहे.