शनिवार, २६ जुलै, २००८

डाळवडा

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
हरबरा डाळ १ वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी
मुगाची डाळ पाव वाटी, तुरीची डाळ अर्धे पाव वाटी (मुगाच्या निम्मी)
लसुण पाकळ्या ८-१०, तिखट हिरव्या मिरच्या ५-६ ,
कोथिंबीर अर्धी वाटी, कढीपत्ता १०-१२ पाने
कांदा छोटा १
मीठ, तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम सर्व डाळी पाण्यामधे ७-८ तास भिजत घाला. नंतर त्या मिक्सरवर वाटुन घेणे. (थोड्या भरड वाटाव्या). वाटलेल्या डाळींमधे लसुण , मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरुन घालणे. कांदा मात्र जाड चिरुन घालावा. कढिपत्ता न चिरता तसाच व चविप्रमाणे मीठ घालुन हे सर्व मिश्रण हाताने कालवावे.
तेलामधे मध्यम आचेवर व लालसर रंग येईपर्यंत वडे तळावेत. वडे पसरट असावेत. आंबट चटणीबरोबर खावेत, जास्त चांगले लागतात. चटण्या (चिंचेची चटणी , अथवा खोबऱ्याची किंवा दाण्याची, पण ह्या चटण्या आंबट दह्यामधे कालवुन घेणे.)
हे मनोगत वरुन घेतले आहे.