सोमवार, २१ जुलै, २००८

सांबार चविष्ट होण्यासाठी युक्ती अनुजा कुलकर्णी मंगळ, १५/०८/२००६ - २३:१७.

वाढणी:सांबार किती असेल त्याप्रमाणे
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तेल,
बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीलिंब, ४/५ मेथीचे दाणे, सुक्या लाल मिरच्या
क्रमवार मार्गदर्शन:
सांबार करून झाले की त्यात वरील जिन्नसाची खमंग फोडणी करून घालावी.
फोडणीमधे कोथिंबीर बरीच करपली तर खूपच मस्त चव येते.
ही संपूर्ण कृती नसली तरी अनेकदा या युक्तीमुळे मला, माझ्या बहिणीला वाहवा मिळाली आहे.. म्हणून येथे लिहिण्याचा प्रपंच!
माहितीचा स्रोत:आई - सौ. रेखा आपटे
अधिक टीपा:तुम्हालाही वाहवा मिळो ही सदिच्छा!
हे मनोगत वरुण घेतले आहे.